Nicholas Pooran : निकोलस पूरनने रचला इतिहास! असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Nicholas Pooran most Sixes Record in Decade : वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरनने टी-20 क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी पूरन हा 2020 च्या दशकात 500 पेक्षा जास्त षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने हा पराक्रम कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) 2025 च्या 16व्या सामन्यात केला. त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार पूरनने बार्बाडोस रॉयल्सविरुद्ध 6 षटकारांच्या जोरावर नाबाद 65 धावांची खेळी केली. यासह त्याने अवघ्या 278 डावांत एका दशकात 500 षटकार पूर्ण करण्याचा विक्रम केला.
निकोलस पूरनने 2020 पासून दरवर्षी सातत्याने षटकारांचा वर्षाव केला आहे. 2020 मध्ये त्याने 48 षटकार, 2021 मध्ये 66, 2022 मध्ये 58, 2023 मध्ये 77 आणि 2024 मध्ये तब्बल 170 षटकार लगावले. यंदा, म्हणजेच 2025 मध्ये, आतापर्यंत 42 डावांत त्याने 85 षटकार ठोकले असून, त्याचा एकूण षटकारांचा आकडा 504 वर पोहोचला आहे.
एका दशकात 500 पेक्षा जास्त षटकार मारण्याचा पराक्रम –
🚨 MOST T20 SIXES IN THIS DECADE 🚨
500* – Nicholas Pooran (278 inns)
358 – Andre Russell (224 inns)
348 – Tim David (247 inns)
334 – Liam Livingstone (212 inns)
334 – Alex Hales (266 inns)And there are still more than 5 years left in this decade. 🤯#nicholaspooran #dpl #cpl pic.twitter.com/rPqFZe2FpZ
— Vishwajit Thakur (@ThakurVish80259) August 30, 2025
निकोलस पूरन आता टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एका दशकात सर्वाधिक षटकार लगणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे फक्त ख्रिस गेल आणि कायरन पोलार्ड आहेत. गेलने 2010 च्या दशकात 363 डावांत 920 षटकार लगावले, तर पोलार्डने 427 डावांत 614 छक्के ठोकले. पूरनने ब्रेंडन मॅकक्लम (408) आणि आंद्रे रसेल (403) यांना मागे टाकले आहे. हा पराक्रम पूरनला खास बनवतो, कारण त्याने दिग्गज ख्रिस गेल आणि पोलार्ड यांच्यानंतर टी-20 षटकारांच्या या खास यादीत स्थान मिळवले आहे.
हेही वाचा – Asia Cup 2025 : आशिया कप सामन्यांच्या वेळेत बदल; भारत-पाकिस्तान सामना किती वाजता सुरु होणार? जाणून घ्या
वयाच्या 29व्या वर्षी त्याने हा टप्पा गाठला असल्याने, त्याच्याकडे नवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, पूरन या दशकात 1000 षटकारांचा टप्पा गाठू शकेल का? यासाठी त्याला पुढील पाच वर्षांत 496 षटकार मारावे लागतील. त्याचा सध्याची फॉर्म पाहता हे अशक्य वाटत नाही. जर पूरनने हे यश मिळवले, तर तो T20 क्रिकेटच्या इतिहासात एका दशकात हजार षटकार लगणारा पहिला फलंदाज ठरेल.
हेही वाचा – US Open 2025 : नोव्हाक जोकोविचचा ऐतिहासिक विजय! फेडररलाही मागे टाकत नव्या विक्रमाची केली नोंद
एका दशकात टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज :
- 920 – क्रिस गेल, 363 डाव (2010 चे दशक)
- 614 – कायरन पोलार्ड, 427 डाव (2010 चे दशक)
- 504* – निकोलस पूरन, 278 डाव (2020 चे दशक)
- 408 – ब्रेंडन मॅकक्लम, 297 डाव (2010 चे दशक)
- 403 – आंद्रे रसेल, 263 डाव (2010 चे दशक)





