पुणे | पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांसाठी पुढचे पाऊल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमान सेवा वाढविण्यासाठी धावपट्टी विस्तार होणे आवश्यक आहे. त्याला प्राधान्य देत, या धावपट्टी विस्तारिकरणासाठी ३५ एकर जागा आवश्यक आहे. त्याचे लवकर भूसंपादन करण्यात येईल. तर सीआयएफएस जवानांची ३२१ जणांची मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर नवीन टर्मिनल सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
नव्याने बांधण्यात आलेल्या विमानतळाची चार महिन्यांपूर्वी उद्घाटन करण्यात आले. परंतु विमानतळ अद्याप सुरु झाले नाही. सध्या जुन्या विमानतळावरुन प्रवासी सेवा सुरू आहे. रविवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी करुन आढावा घेतला.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी हवाई दल आणि खासगी जागेची भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक विभागाशी चर्चा करून ही जागा ताब्यात घेतली जाईल.
त्यासाठी जवळपास १६० कोटी रुपये अपेक्षित खर्च आहे. त्यामध्ये राज्य सरकार ६० टक्के, पुणे महापालिका २० आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए १० टक्के खर्च देणार आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.
प्रवासी क्षमता वाढणार…
धावपट्टीचा विस्तार झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि मोठ्या विमानांची संख्या वाढणार. त्यामुळे पुण्यातून जाणार्या प्रवासी क्षमता वाढण्यासाठी फायद्याचे ठरेल. सध्या सध्या पुण्यातून बोईंग, एअरबस ए ३१९, २० यांसारख्या विमान धावतात. धावपट्टीचे विस्तार झाल्यावर येथून ड्रीम, एअरबस ३५० असे विमाने उड्डाण घेऊ शकणार आहेत. यामुळे थेट आंतरराष्ट्रीय प्रवास होऊ शकतो.





