पुणेकरांच्या कामाची बातमी.! राजाराम पुलावरील वाहतूक बदल; इनामदार चौकात ‘राईट टर्न’ बंद
पुणे – सिंहगड वाहतूक विभाग अंतर्गत राजाराम पुल ते फन टाईम थिएटर दरम्यान सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, सिंहगड रोडवरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी इनामदार चौकातील उजवीकडील वळण (Right Turn) तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत आहे.
वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, या ठिकाणी उतरताना वाहनांचा वेग अधिक असतो. त्यामुळे उजवीकडे वळणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग :
वाहनचालकांनी राजाराम पुल चौकात यु-टर्न घेऊन आपल्या इच्छित स्थळी जावे, असे निर्देश वाहतूक विभागाकडून देण्यात आले आहेत.
सूचना आणि हरकतीसाठी वेळ :
नागरिकांनी या निर्णयावर आपले अभिप्राय वा हरकती ४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत लेखी स्वरूपात पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा, पुणे येथे सादर कराव्यात. नागरीकांच्या सूचनांचा विचार करून अंतिम आदेश घेतला जाईल. अत्यावश्यक सेवेतील वाहने या आदेशातून वगळण्यात येतील.
– हिंमत जाधव, पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर





