Pune News : सकल हिंदू समाज सिंहगड रोड यांच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: सकल हिंदू समाज सिंहगड रोड यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महाराणा प्रताप, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ह भ प. दत्तात्रय धुमाळ महाराज यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन दत्त मंदिर मधुबन सोसायटी प्रवेशद्वारसमोर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती प्रांत संयोजिका प्रिया रसाळ दत्ता भाऊ कोल्हे, सुरेश जोशी, प्रदीप कुलकर्णी आणि कोल्हेवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला कोल्हेवाडी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला सुनील शिंदे विश्व हिंदू परिषदेचे सिंहगडभाग नांदेड प्रखंड सहमंत्री, आदित्य काळे विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग नांदेड प्रखंड, कार्यकर्ता प्रीतम देशमुख यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमास नवीन दत्त मंदिर व्यवस्थापन समितीचे खूप मोलाचे सहकार्य लाभले.





