West Bengal Election 2026: राजकीय विश्लेषकांचा ‘तो’ अंदाज खरा ठरला! तिसऱ्या यादीत भाजपची मोठी खेळी
West Bengal Election 2026:

West Bengal Election 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपली उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत भाजपने एक मोठा राजकीय निर्णय घेत कोलकाता येथील आर.जी. कर मेडिकल कॉलेजमधील अत्याचार व हत्या प्रकरणातील पीडितेच्या आईला, रत्ना देबनाथ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पाणीहाटी विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आले आहे.
तृणमूल काँग्रेसविरुद्ध राजकीय लढा –
ऑगस्ट २०२४ मध्ये आर.जी. कर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. पीडितेच्या आईने यापूर्वीच तृणमूल काँग्रेस सरकारविरुद्ध राजकीय लढा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. भाजपने आता त्यांना अधिकृत उमेदवारी देऊन या मुद्द्याला निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणले आहे. दरम्यान, घटनेनंतर राजकीय विश्लेषक यांनी आगामी निवडणूकीत भाजप पीडितेच्या कुटुंबात उमेदवारी देणार असे अंदाज वर्तवण्यात आले होते. ते आज अखेर खरे ठरले आहेत.
तिसऱ्या यादीतील उमेदवार –
BJP releases the third list of 19 candidates for the upcoming West Bengal Assembly elections pic.twitter.com/Z9TFoceVNB
— ANI (@ANI) March 25, 2026
निवडणुकीचे गणित आणि टप्पे –
भाजपने यापूर्वी दोन याद्या जाहीर केल्या असून, पहिल्या यादीत १४४ तर दुसऱ्या यादीत रूपा गांगुली आणि निसिथ प्रामाणिक यांच्यासह १११ उमेदवारांची घोषणा केली होती. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी २३ आणि २९ एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान होणार असून, ४ मे रोजी निकाल जाहीर होतील.
हेही वाचा – खात्यातून परस्पर पैसे कटतायत? Google Pay, PhonePe आणि Paytmवर ‘ऑटोपे’ सुविधा अशी करा बंद





