AutoPay : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरामुळे ‘ऑटोपे’ (AutoPay) किंवा ‘ऑटो डेबिट’ ही सुविधा अत्यंत लोकप्रिय झाली आहे. याद्वारे मोबाईल रिचार्ज, ओटीटी सबस्क्रिप्शन, वीज बिल, ईएमआय किंवा एसआयपीचे पेमेंट आपोआप वेळेवर पूर्ण होते. मात्र, अनेकदा वापरकर्त्यांना आपल्या खात्यातून कोणत्या सेवांसाठी पैसे कापले जात आहेत याची कल्पना नसते, ज्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडू शकते. ही गैरसोय टाळण्यासाठी हे पेमेंट थांबवण्याचे दोन मार्ग आहेत; एक म्हणजे काही काळासाठी पेमेंट ‘पॉज’ करणे किंवा ते कायमचे ‘कॅन्सल’ करणे. प्रमुख ॲप्सवर ऑटोपे बंद करण्याची प्रक्रिया: १. पेटीएम (Paytm): ॲपमधील ‘प्रोफाईल’ सेक्शनमध्ये जाऊन ‘UPI Settings’ वर क्लिक करा. ‘Automatic Payments’ किंवा ‘Payment Management’ पर्याय निवडा. ज्या सेवेचे पेमेंट बंद करायचे आहे ती निवडून ‘Cancel Automatic Payment’ वर क्लिक करा. २. गुगल पे (Google Pay): ॲप उघडून ‘You’ टॅबमध्ये जा आणि ‘AutoPay’ पर्यायावर क्लिक करा. ‘Live’ सेक्शनमध्ये जाऊन संबंधित सर्विस निवडा. ‘Cancel AutoPay’ वर क्लिक करून तुमचा ‘UPI PIN’ टाका. ३. फोनपे (PhonePe): ‘प्रोफाईल’ आयकॉनवर क्लिक करून ‘Manage Payments’ मध्ये जा. ‘More Options’ अंतर्गत ‘AutoPay’ निवडा. ‘Ongoing’ सेक्शनमधील ॲक्टिव्ह पेमेंट निवडून ते ‘Cancel’ करा आणि पिन टाकून प्रक्रिया पूर्ण करा.