काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याची गरज सध्या नाही – सुशीलकुमार शिंदे
Updated On:

कोल्हापूर – काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याची गरज सध्या नाही असे मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ते कोल्हापूरात पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान शेतकरी आंदोलन चिघळलं आहे, अशा वेळी नेतृत्व बदल चर्चा करणं योग्य नाही, पुढे कधीतरी चर्चा करता येईल अस ही त्यांनी म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांनी उद्या बोलवलेल्या बैठकीवर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनावर बोलताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, केंद्र सरकारची हुकूमशाही पद्धतीने वाटचाल सुरू होणार असं मी म्हटलं होतं, ती त्यांनी सुरू केल्याचं दिसत आहे. शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करून मार्ग काढणं गरजेचं होतं, ते तसं झालं नाही असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.





