MP Sanjay Deshmukh Accident: खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला ट्रकची धडक; किरकोळ दुखापत, प्रकृती स्थिर
MP Sanjay Deshmukh Accident:
Updated On:

MP Sanjay Deshmukh Accident: शिवसेना (ठाकरे गट) चे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला (इनोव्ह) गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात खासदारांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले, मात्र ते सुदैवाने थोडक्यात बचावले.
एका कार्यक्रमातून परतत असताना हा अपघात झाला. धडकेत खासदार देशमुख यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांनी दिग्रस येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
अपघाताची बातमी परिसरात पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व रस्ता मोकळा केला.





