लक्ष्मीनगराच्या विकासासाठी आमदार दिलीप मोहिते वचनबद्ध – संजय मोहिते

आळंदी – ज्या ज्या वेळी नागरिक समस्या घेऊन आले त्या त्या वेळी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. आगामी काळातही उर्वरित रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन यांसह सर्व सुविधा तसेच श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारास सर्वोतोपरी प्रयत्न करण्यासाठी, लक्ष्मीनगराच्या विकासासाठी आमदार दिलीप मोहिते वचनबद्ध आहेत, असे सांगत नागरिकांनी त्यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन खेड- आळंदी विधानसभा मतदार संघाचे (Khed Alandi Assembly constituency) राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते यांचे बंधू संजय मोहिते यांनी केले.
लक्ष्मीनगर (चऱ्होली खुर्द, ता. खेड) येथील नागरिकांशी संजय मोहिते यांनी संवाद साधला. यावेळी माजी सरपंच कैलास थोरवे, माजी उपसरपंच पांडुरंग थोरवे, चऱ्होली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन योगेश थोरवे, संचालक शिवाजी थोरवे, ज्ञानेश्वर पगडे, सचिन थोरवे, गणेश थोरवे, अशोक थोरवे, सिद्धेश्वर पगडे, अर्जुन थोरवे, शिवाजी धुळगंड, भाऊसाहेब माळशिखरे, दुर्गादास इंगळे, सदाशिव पोकळे, भारत कोडलिंगे, रामदास भगत, दगडू सुरवसे, व्यंकटेश नाईक, किरण मोटकर, भागवत काटकर, यांसह लक्ष्मीनगर, पुण्यभूमी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.





