लक्ष्मीनगरात चिखलमय रस्त्यामुळे नागरिक त्रस्त; त्वरित उपाययोजनेची मागणी
Updated On:

आळंदी: लक्ष्मीनगर (चऱ्होली खुर्द, ता. खेड) येथील रस्ते पावसामुळे चिखलमय झाले असून, यामुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वृद्ध, गरोदर महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून ये-जा करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे.
चिखलामुळे दुचाकी घसरण्याच्या घटना वाढल्या असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.





