India Corona | आज पुन्हा देशातील करोना रुग्णसंख्येबाबत दिलासादायक बातमी
Updated On:

नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील 24 तासांत म्हणजे बुधवारी दिवसभरात दोन लाख 76 हजार 70 नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात तीन लाख 69 हजार 77 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या 24 तासांत 3,874 मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात एकूण मृतांची संख्या दोन लाख 87 हजार 122 वर जाऊन पोहोचली आहे. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात 34 हजार 31 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.





