Coronavirus in India । काही वर्षांपूर्वी जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा सगळीकडे आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोविड-१९ म्हणजेच कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात एक अपडेट शेअर केले आहे. त्यानुसार देशभरात अर्लट जारी करण्यात आला आहे. १९ मे पर्यंत देशात कोविडचे २५७ सक्रिय रुग्ण Coronavirus in India । केंद्र सरकारने जारी केलेल्या एका अहवालानुसार, “१९ मे पर्यंत देशात कोविडचे २५७ सक्रिय रुग्ण आढळले आहेत.” त्यामुळे देशात अर्लट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, भारतासोबतच इतर देशांमध्येही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आशियामध्ये कोविड १९ च्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यापैकी बहुतेक प्रकरणे JN1 प्रकाराची आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १२ मे पर्यंत देशात १६४ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केरळमध्ये सर्वाधिक ६९ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही कोविड १९ ने थैमान घातले आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केंद्र सरकारने याबाबत अलर्ट जारी केला आहे. देशात कुठे आणि किती कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले? देशात सर्वाधिक प्रकरणे केरळमध्ये नोंदली गेली आहेत. महाराष्ट्र या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडूमध्ये ३४ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कर्नाटकमध्ये ८ नवीन प्रकरणे नोंदवली गेली, तर गुजरातमध्ये ६ आणि दिल्लीमध्ये ३ प्रकरणे नोंदली गेली. हरियाणा, राजस्थान आणि सिक्कीममध्ये एक नवीन रुग्ण आढळला. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की केरळमध्ये ९५ सक्रिय प्रकरणे आहेत. भारताव्यतिरिक्त, कोविडचा इतर देशांमध्येही प्रवेश Coronavirus in India । आशियातील अनेक देशांमध्ये कोविडने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. नेशन थायलंडच्या मते, ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात हाँगकाँगमध्ये ३१ प्रकरणे नोंदवली गेली. सिंगापूरमध्ये, २७ एप्रिल ते ३ मे या आठवड्यात कोविड-१९ प्रकरणांची अंदाजे संख्या १४,२०० होती, जी मागील आठवड्याच्या आकडेवारीपेक्षा जास्त होती. गेल्या आठवड्यात ११,१०० प्रकरणे नोंदवण्यात आली.