Income Tax Rules:“भैय्या, QR कोड कुठे आहे?” हा आजच्या काळातला सर्वात सोपा आणि सर्रास विचारला जाणारा प्रश्न. चहाची टपरी असो वा मोठे शोरूम, आता सगळीकडे डिजिटल व्यवहार होतात. पण याच डिजिटल क्रांतीच्या नावाखाली काही दुकानदार ‘स्मार्टनेस’ दाखवण्याच्या नादात प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) कचाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर तुम्ही दुकानदार असाल आणि ग्राहकांकडून पैसे घेण्यासाठी स्वतःच्या मर्चेंट क्यूआर कोडऐवजी तुमच्या कर्मचाऱ्याचा, भावाचा किंवा नातेवाईकाचा QR कोड वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. नेमकं प्रकरण काय? समजा, एका दुकानदाराने स्वतःच्या विक्रीचे पैसे थेट स्वतःच्या खात्यात न घेता आपल्या सेल्समनच्या खात्यावर घेण्यास सुरुवात केली. दिवसभराचे हजारो रुपये त्या सेल्समनच्या खात्यात जमा होतात आणि संध्याकाळी तो कर्मचारी ते पैसे काढून दुकानदाराला रोख स्वरूपात परत करतो. दुकानदाराला वाटते की यामुळे त्याची ‘सेल’ कागदोपत्री कमी दिसेल आणि त्याला टॅक्स भरावा लागणार नाही. पण इथेच मोठी चूक होते. Inflation: साबण, सोडा आणि खाद्यतेल महागणार; FMCG कंपन्यांकडून दरवाढीची तयारी कर्मचारी ठरू शकतो ‘टॅक्स चोर’ – उत्पन्न कर विभागाच्या नजरेत तो पैसा दुकानदाराचा नसून त्या कर्मचाऱ्याची कमाई मानली जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार महिना १५ हजार असेल आणि त्याच्या खात्यात वर्षाला २०-३० लाख रुपये जमा होत असतील, तर प्राप्तिकर विभाग त्याला नोटीस पाठवू शकतो. जेव्हा विभाग त्या पैशांचा हिशोब मागेल, तेव्हा तो कर्मचारी ते पैसे व्यवसायाचे आहेत हे सिद्ध करू शकणार नाही. कारण त्याच्याकडे ना ‘बिझनेस बुक्स’ असतील ना ‘GST रजिस्ट्रेशन’. खात्यात पैसे आल्यामुळे सर्व दंड आणि टॅक्स चोरीचा ठपका त्या कर्मचाऱ्यावरच येईल. दुकानदारावर ओढवू शकते ‘बेनामी’ व्यवहाराची कारवाई – मालकाला वाटत असेल की आपण वाचलो, तर ते चुकीचे आहे. तपासाची चक्रे फिरली की धागेदोरे मालकापर्यंत पोहोचतातच. दुसऱ्याच्या नावाने स्वतःचे उत्पन्न लपवणे हे ‘बेनामी व्यवहार’ या गंभीर गुन्ह्याखाली येऊ शकते. सोबतच, विक्री लपवल्यामुळे हा GST चोरीचाही प्रकार ठरतो. तज्ज्ञांचा सल्ला: काय काळजी घ्याल? मर्चेंट अकाउंटचा वापर: नेहमी आपल्या फर्मच्या किंवा स्वतःच्या नावाच्या ‘मर्चेंट QR कोड’चाच वापर करा. बँक लिंकिंग: तुमचा QR कोड बँक खाते आणि GST नंबरशी लिंक ठेवा. करंट अकाउंट: व्यवसायाचे पैसे वैयक्तिक बचत खात्यात (Savings Account) न घेता ‘करंट अकाउंट’मध्येच (Current Account) जमा करा. डिजिटल व्यवहारांची पारदर्शकता हीच तुमची सुरक्षा आहे, हे लक्षात ठेवा!