अमिताभ बच्चन यांच्याविरूद्धच्या तक्रारीनंतर नव्या वादाला तोंड फुटले

मुंबई – भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या निर्मात्यांविरूद्ध पोलीसांत तक्रार करत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. ट्विट करून त्यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात मनुस्मृती व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाने हिंदुंच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप अभिमन्यू पवार यांनी केला आहे.
मी अभिनेता श्री अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात दिलेल्या तक्रारीवरून चुकीच्या गोष्टीचे समर्थन केल्याचा किंवा इतिहास नाकारल्याचा विपर्यास झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति मला पराकोटीचा आदर आहे आणि ही बाब माझ्या लातूर जिल्ह्यात सर्वश्रुत आहे.
1/5 pic.twitter.com/BAbuUb4NxG— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) November 3, 2020
‘कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याबद्दल तसेच अत्यंत सलोख्याने राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दर महानायक अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्कच्या विरोधात तक्रार नोंदवली.’ असे ट्विट करत भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी तक्रार नोंदवल्याची माहिती दिली आहे.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याबद्दल तसेच अत्यंत सलोख्याने राहणार्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महानायक श्री अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात तक्रार नोंदवली.
1/6 pic.twitter.com/PWnUoWxM2M— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) November 3, 2020
या ट्विटनंतर अभिमन्यू पवार यांच्यावर अनेकजण टीका करत आहे. त्यानंतर पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे, ‘मी अभिनेता अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात दिलेल्या तक्रारीवरून चुकीच्या गोष्टीचे समर्थन केल्याचा किंवा इतिहास नाकारल्याचा विपर्यास झाला आहे. भारतरत्न डाॅ. बाबसाहेब आंबेडकर यांच्याप्रति मला रपाकोटीचा आदर आहे आमि ही बाब माझ्या लातूर जिल्ह्यात सर्वश्रुत आहे.’ असे ट्विट अभिमन्यू पवार यांनी केले आहे.





