AFG vs NZ one-off Test Match : न्यूझीलंड संघ भारतात दाखल…! अफगाण शैलीत झाले स्वागत, पहा Video

AFG vs NZ one-off Test match : – अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या एकमात्र कसोटी लढतीसाठी न्यूझीलंडचा संघ गुरूवारी सकाळी भारतात दाखल झाला आहे. अफगाणिस्तानने किवी संघाचे जोरदार स्वागत केले. न्यूझीलंड संघ हॉटेलमध्ये पोहोचताच बाहेर फलकावर लिहिले होते, ‘न्यूझीलंड संघाचे अफगाण शैलीत स्वागत’ आहे’. कर्णधार टीम साऊदीने संघाचे नेतृत्व केले आणि ग्रेटर नोएडामधील हॉटेलमध्ये टीम पोहोचल्यावर खेळाडूंवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. ACB ने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Welcome @BlackCaps
Video: The New Zealand team has arrived at the hotel in Greater Noida, India, for the one-off Test match against Afghanistan’s national team.#AfghanAtalan | #AFGvNZ | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/UlQApG5UXP
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 5, 2024
टीम साऊदीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघ ग्रेटर नोएडामध्ये ही लढत खेळणार आहे. 9 सप्टेंबरपासून या एकमेव कसोटी लढतीला सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने ही लढत भारतात घेण्यात येणार आहे. या लढतीनंतर न्युझीलंड भारतासोबत तीन कसोटी सामान्यांची मालिका देखील खेळणार आहे.
या मालिकेच्या सरावासाठी न्यूझीलंडचे काही खेळाडू भारतात आले आहेत. ते खेळाडू चेन्नई सुपर किंग्स अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. चेन्नईसंघाचे प्रतिनिधीत्व करणारा रचिन रवींद्र देखील या न्यूझीलंड संघाच्या वरिष्ठ खेळाडूंसह सराव करत आहे. अफगाणिस्तानचा लेग स्पिनर असलेला रशीद खानला पाठीच्या दुखापतीमुळे संघात स्थान मिळू शकलेले नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये हशमतुल्लाह शाहिदी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
न्यूझीलंडचा संघ : टिम साउदी (कर्णधार), टॉम ब्लंडेल, मायकल ब्रेसवेल, डेवोन कॉनवे, मॅट हेनरी, टॉम लॅथम (उप-कर्णधार), डेरिल मिशेल, विल ओ’रुरके, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सेंटनर, बेन सियर्स, केन विलियमसन, विल यंग





