Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; केरळ कनेक्शन आलं समोर…

Disha Salian Case News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मालवण पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून दिशाने आत्महत्याच केल्याचे समोर आले आहे. दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधामुळे दिशा इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली आहे.
दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाबाबत मित्रांनाही सांगितल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्या सतीश सालियन यांनाच आता संशयाच्या घेऱ्यात पकडले जात आहे. आहातच आता केरळमध्ये एका गरोदर हत्तीणीसोबत घडलेल्या घटनेने दिशा सालियन नैराश्येत होती अशी माहिती समोर आली आहे. Disha Salian Case News Update
दिशाच्या वडलांचे काही विवाहबाह्य संबंध होते, ती त्यांना पैसे द्यायची, त्यातून ती निराश होती. हे सर्व मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये लिहिल्याचा दावा केला जात आहे. मात्र जर तो रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतला आहे, तर मग तो वैध कसा?, त्यातील गोष्टींना काही अर्थच उरत नाही, असे सतीश सालियनचे वकील निलेश ओझा यांनी म्हटले आहे. तसेच पोलिसांनी रिपोर्ट मागे घेतल्यानंतर एसआयटीची स्थापना झाली, आणि नव्याने तपास सुरू झालाय. त्यामुळे या रिपोर्टचा आरोपींना बचावात काहीही फायदा होणार नाही, असेही निलेश ओझा यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना म्हणाले, दिशा सालियनचा मित्र रोहन राय याने वर्षभरानंतर एका मुलाखतीत दिशाच्या मृत्यूबाबत काही गौप्यस्फोट केले होते. 15 नोव्हेंबर 2022 रोजी एका वृत्तपत्रात ही मुलाखत छापून आली होती. दिशा प्राण्यांच्या समस्यांबाबत फार संवेदनशील होती, केरळमध्ये एका गरोदर हत्तीणीसोबत घडलेल्या घटनेने ती नैराश्येत होती, असे म्हटले होते. पोलिसांच्या अहवालात तिच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याने ती नौराश्येत होती, असे लिहिल्याचे बोलले जात आहे. मालवणी पोलिसांनी किती खोटे पुरावे तयार केले आहेत, यासाठी त्यांना नोबल पुरस्कार मिळायला हवा, अशी टीकाही निलेश ओझा यांनी यावेळी केली. Disha Salian Case
पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये काय?
प्रोजेक्टमध्ये झालेले नुकसान आणि वडिलांच्या अफेअरमुळे त्यांना वारंवार पैसे द्यावे लागत होते. त्यामुळे दिशा तणावात होती. दिशाने याबाबत मित्रांना सांगितले होते. दिशाच्या मैत्रिणींचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत, त्यामधून ही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ४ जून २०२१ रोजी या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट दिशाच्या वडिलांना दाखवला होता, अशी माहिती देखील मिळत आहे. जुन्या क्लोजर रिपोर्टमुळे दिशाच्या मृत्यूला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
दिशाचा प्रियकर रोहन राय, तिचे मित्र, आई वडिलांचे नोंदवल्यानंतर मालवण पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट तयार केला होता. मालवण पोलिसांनी तयार केलेले क्लोजर रिपोर्ट दाखल झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये राज्य सराकरने एसआयटी बनवून तपास सुरू केला. सरकार बदलल्यानंतर महायुतीच्या सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीचा रिपोर्ट मात्र वर्षाभराहून अधिक काळ प्रतीक्षेत आहे. आता एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कोर्ट काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच मृत्यू
दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होते, असे देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असे रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. Disha Salian Case





