Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांनी पुरावा दाखवावा; वरुण सरदेसाईंनी फेटाळले सर्व आरोप
शिवसेना(ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी दिशा सालियन प्रकरणावरुन भूमिका मांडताना, नेते आदित्य ठाकरे त्या लोकांना ओळखत देखील नव्हते. राजकीय प्रतीमा मलीन करण्याचा प्रकार असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले.

Varun Sardesai : दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मानहानीची नोटीस देण्यासाठी वकिलांसह मातोश्री येथे पोहोचत ठाकरेंच्या वकिलांकडे नोटीस सोपवली. यापूर्वी शिवसेना(ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी दिशा सालियन प्रकरणावरुन भूमिका मांडताना, नेते आदित्य ठाकरे त्या लोकांना ओळखत देखील नव्हते. राजकीय प्रतीमा मलीन करण्याचा प्रकार असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले.
सरदेसाई (Varun Sardesai) म्हणाले, एकतरी पुरावा आहे का तुमच्याकडे? तपासात काय ते पुढे येईल परंतु आता आदित्य ठाकरेंच्या विरोधात पुराव आहे का? सीबीआय चौकशी होऊ द्या, काय ते पुढे येईल, असे सरदेसाई म्हणाले. दिशाचे वडील सतीश सालियन यांच्याकडून आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप सरदेसाई यांनी फेटाळून लावले. आदित्य ठाकरे हे सुशांत सिंग आणि दिशा सालियन यांना ओळखत नव्हते.
सतीश सालियन यांच्याकडून फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आरोप सुरू आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते मातोश्रीवर नोटीस देण्यासाठी येत आहेत, यामध्ये आदित्य ठाकरे यांचा काही संबंध नाही असेही सरदेसाई यांनी सांगितले. मोठ्या तरुण नेत्याला बदनाम करण्यासाठी हा आरोप केला जात आहे. महायुती सरकार असताना तपास झाला होता.
पोलिसांनी पाच वेळा त्यांच्या वडिलांना नोटीस देऊन जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होता. पण ते आले नव्हते, कोर्टामध्ये 18 पानांचे सरकारने प्रतिज्ञापत्र फाईल केले आहे. त्यामध्ये देखील आदित्य ठाकरे यांच्या काही रोल नसल्याचे सांगण्यात आला आहे. आदित्य ठाकरे संदर्भात आरोप करणाऱ्या व्यक्तींकडे एकही पुरावा असेल तर समोर आणावा. फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बदनाम करणे हे आता थांबवावे, असेही सरदेसाई (Varun Sardesai) यांनी म्हटले.






