Shivani Surve New Marathi Serial| स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक मालिका सुरू होणार आहे. यानिमित्त ‘ती परत येतेय..’ असा टॅग देखील वापरला जात होता. त्यामुळे या नव्या मालिकेविषयी आणि अभिनेत्रीविषयी सर्वांच फार उत्सुकता होती. अखेर या नव्या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर तब्बल 9 वर्षानंतर शिवानी कमबॅक करणार आहे.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ असे या मालिकेचे नाव असून यात शिवानी मुख्यभूमिकेत पाहायला मिळणार आहे. यात ती मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक आणि वडिलांच्या शब्दाबाहेर नसणारी अशी मानसी यात दाखवण्यात आली आहे. तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे फारच उत्सुक आहे. Shivani Surve New Marathi Serial|
View this post on Instagram
यापूर्वी शिवानी स्टार प्रवाहवरील ‘देवयानी’ मालिकेत झळकली होती. यातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता पुन्हा ती स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. ‘देवयानी’ मालिकेप्रमाणे नव्या मालिकेलाही असेच प्रेम आणि यश मिळेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. दरम्यान, ही मालिका 17 जूनपासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो स्टार प्रवाहने रिलीज केला आहे. तिच्या या नव्या मालिकेबाबत चाहते देखील खूप उत्सुक आहेत. Shivani Surve New Marathi Serial|
हेही वाचा: