After OLC Marathi Film : ‘आफ्टर ओ.एल.सी ’ हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. आता हा दमदार ॲक्शन चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘आफ्टर ओ.एल.सी’चा (After OLC Marathi Film) ट्रेलर प्रदर्शित होताच त्यातील तगडी ॲक्शन, रहस्यमय कथानक आणि थरारक प्रसंगांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्स आणि थरारक प्रसंगांमध्ये कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरणार आहे.हा चित्रपट कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीला जोडणारा धागा आहे. यांत निर्माते ते अगदी कलाकार हे कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीतील दिग्गज आहेत. Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडली; सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण आदेश या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नड सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी केले आहे. मराठी भाषेत प्रदर्शित होणारा हा सिनेमा असल्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल विशेष कुतूहल आहे. Shivani Surve या चित्रपटात कवीश शेट्टी , मेघा शेट्टी , शिवानी सुर्वे , विराट मडके यांच्यासह प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे, शलाका पवार, रुक्मिणी सुतार ही अनेक मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत. हेही वाचा: Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडली; सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण आदेश