प्रसाद ओक आणि स्वप्निल जोशी पहिल्यांदाच एकत्र; नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Swapnil Joshi And Prasad Oak | मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांची जोडी पहिल्यांदाच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘जिलबी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. समोर आलेल्या पोस्टरमध्ये प्रसाद, स्वप्नीलचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. यात अभिनेत्री शिवानी सुर्वे देखील पाहायला मिळत आहे.
या तिघांच्या जोडीसह पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांनी आपल्या अभिनयाने मनोरंजनाच्या या ‘जिलबी’चा रंगत वाढवली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले असून १७ जानेवारीला ‘जिलबी’ चित्रपट मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.
आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी कायमच वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘जिलबी’च्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या सहयोगाने मनोरंजनाची भन्नाट मेजवानी आणली आहे.
View this post on Instagram
स्वप्नील आणि प्रसाद एकत्र झळकणार असल्याने सध्या प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तर, यांच्या सोबतीला मालिकाविश्व गाजवणारी शिवानी सुर्वे प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या तिघांची गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
दरम्यान, ‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. तर छायांकन गणेश उतेकर, कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे असून क्रिएटिव्ह दिग्दर्शन राहुल व्ही. दुबे यांचे आहे. रूपा पंडित आणि राहुल व्ही.दुबे सहनिर्माते असून कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी १७ जानेवारीला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
हेही वाचा:
गौतम अदानींच्या अडचणीत वाढ; २ हजार कोटींच्या प्रकरणात अमेरिकेच्या कोर्टानं ठरवलं दोषी




