नवा विक्रम रचला..! इंदूरमध्ये भाजप विरोधात पहिल्यांदाच NOTA ला मिळाली 2 लाखांहून अधिक ‘मते’

Lok Sabha Election 2024 । इंदूरमध्ये, मध्य प्रदेशातील सर्वात महत्त्वाच्या जागांपैकी एक आहे. येथे भाजप पक्षाचा विरोधात कोणत्याही उमेदवार नसल्यामुळे भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांनी सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. मात्र यापेक्षा जास्त येथे NOTA ला मते पडल्याची चर्चा आहे.
इंदूर लोकसभा मतदारसंघातून शंकर लालवानी यांना 10 लाखांहून अधिक मते मिळाली आहे. येथे NOTA दुसऱ्या क्रमांकावर आहे. नोटाला 2 लाखांहून अधिक मते मिळाली आहे. यासह इंदूरमधील ‘नोटा’ ने बिहारमधील गोपालगंजचा पूर्वीचा विक्रम मोडला आहे.
गोपालगंजमध्ये NOTA ला 51 हजार 660 मते मिळाली होती. NOTA ला पश्चिम चंपारणमध्ये 45,609 मतांसह दुसरे स्थान मिळाले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सप्टेंबर 2013 मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ‘NOTA’ बटण समाविष्ट करण्यात आले होते. काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी अर्ज मागे घेतल्यापासून इंदूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला.
काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला होता
इंदूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने पुन्हा एकदा शंकर लालवाणी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने अक्षय कांती बम यांना उमेदवारी दिली, पण त्यांनी उमेदवारी मागे घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेसकडून NOTA चा प्रचार करण्यात आला आणि त्यासाठी मोहीमही सुरू करण्यात आली.
राज्यात लोकसभेच्या २९ जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 28 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती. या निवडणुकीत भाजप सर्व जागांवर आघाडीवर आहे. राजकीयदृष्ट्या मध्य प्रदेशसाठी आजचा दिवस मोठा आहे. आज अनेक दिग्गजांचे भवितव्यही ठरवले जाणार आहे. दोन माजी मुख्यमंत्री आणि दोन केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात आहे.





