पुण्यात नवे करोना 727 बाधित सापडले , 398 जणांना डिस्चार्ज

पुणे – शहरात चोवीस तासांत नवीन 727 करोना बाधित आढळून आले असून, बरे झालेल्या 398 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उपचारादरम्यान 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 2 जण हे महापालिका हद्दीबाहेरील आहेत.
शहरातील ऍक्टिव्ह करोना बाधितांची संख्या 4 हजार 253 पर्यंत पोहोचली आहे. 449 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. यापैकी 245 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. आतापर्यंत शहरात 11 लाख 28 हजार 332 संशयितांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली असून, त्यात 2 लाख 1 हजार 189 जणांना करोनाची बाधा झाली आहे.
यापैकी 1 लाख 92 हजार 89 रुग्ण बरेही झाले आहेत. तर 4 हजार 847 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात आज 7 हजार 108 संशयितांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे.
करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने स्वॅब कलेक्शन सेंटर्सची संख्या वाढवली असून, ती आता 20 झाली आहे. या आधी 17 ठिकाणी हे सेंटर होते. सिंहगडरस्ता, वारजे आणि हडपसर या तीन ठिकाणी नव्याने सुरू करण्यात आले आहेत.





