नेवासा जळीतकांड : व्यापाऱ्यांना नेत्यांकडून सांत्वन तर कार्यकर्त्यांकडून प्रत्यक्षात मदत जाहीर

भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे,आजी – माजी आमदारांच्या सुपूञांकडून नुकसानग्रस्त ठिकाणची पाहणी
नेवासा : नेवासा शहरात झालेल्या अग्नी तांडवात बारा दुकानांना लागलेल्या आगीत सर्वच्या सर्व दुकाणे जळून खाक झाली या घटनेची माहीती मिळताच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी दुर्घटनास्थळी भेट देत राज्याचे महसुल तथा जिल्ह्याचे पालकमंञी ना.राधाकृष्ण विखे – पाटील यांना घटनेची माहीती देवून प्रशासनाला नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांच्या अग्नीतांडवाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले तर आजी – माजी आमदारांच्या सुपूञांनीही नुकसानग्रस्त ठिकाणची पाहणी करुन जळीत प्रकरणातील व्यापाऱ्यांचे सांत्वन करत धीर दिला तर शहरातील आजी – माजी आमदारांच्या पदाधिकाऱ्यांनी जळीत कांडातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना स्वता: मदत करुन समाजातील दानशुर व्यक्तींना मदतीचे आवाहन करत अर्थिक मदत दिली.
शहरात शुक्रवारी लागलेल्या आगीत बारा दुकाणे जळून खाक होवून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले या घटनेची माहीती मिळताच राज्याचे माजी मंञी आमदार शंकरराव गडाख यांचे सुपूञ युवानेते उदयन गडाख आणि भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे सुपूञ विष्णुभैय्या मुरकुटे यांनी शहरात घडलेल्या दुर्देवी जळीत कांडाची पाहणी करुन नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांचे सांत्वन करत धीर दिला. माञ आजी – माजी आमदारांचे सुपूञ दुर्घटनास्थळी येण्यापुर्वीचे आमदार गडाख यांचे कार्यकर्ते संजय सुखधान यांनी जळीत कांडातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना पन्नास हजार रुपयांची अर्थिक मदत जाहिर करुन समाजातील दानशुरांना अर्थिक मदतीचे आवाहन केले त्यामुळे शहरातील भाजप – शिवसेना मिञपक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना अर्थिक मदती करण्यासाठी पुढे आले.
नेवासा शहरात झालेल्या अग्नी तांडवामध्ये शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत शहरातील सुमारे बारा दुकाने जाळून खाक झाले घडलेली घटना इतकी भयंकर होती की, ही आग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन व भेंडा कारखाना येथील अग्निशमन दलाला तब्बल सात तास शर्तीचे प्रयत्न आणि संघर्ष करुनही या लागलेल्या आगीत दुकाणातील सर्वच्या सर्व माल बेचिराख होवून व्यावसायिकांचे मोठे अर्थिक नुकसान झाले या घटनेचे वृत्त समजताच राज्याचे माजी मंञी आमदार शंकरराव गडाख यांचे सुपूञ उदयन गडाख आणि भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे सुपूञ विष्णूभैय्या मुरकुटे यांनी जळीत झालेल्या दुकाणांची पाहणी करुन शनिवारी (दि.२७) रोजी जळीतकांडातील व्यापाऱ्यांना धीर दिला.
यावेळी आमदार शंकरराव गडाख समर्थक माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तर भाजपाचे माजी आमदार मुरकुटे समर्थक माजी नगरसेवक सुनिल वाघ, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,विवेक ननवरे. श्रीकांत बर्वे,शहराध्यक्ष रोहित पवार,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रतिक शेजूळ,राजेंद्र मुथा,देविदास साळुंके, व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जळीत कांडातील दुर्घटनास्थळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव,भाजपाचे युवानेते ऋषिकेश शेटे,इंदिरा कॉंग्रेसचे संभाजी माळवदे,आम आदमी पार्टीचे अॅड.सादिक शिलेदार यांच्यासह अनेक सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेञातील मान्यवरांनी भेटी देवून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांचे सांत्वन करत अनेकांनी धीर दिला.
नेवासा शहरातील आगीमध्ये प्रचंड नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांसाठी मदत करणाऱ्या सामाजिक राजकिय क्षेञातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे नावे पुढील प्रमाणे अशी आहेत आमदार शंकरराव गडाख यांचे समर्थक संजय सुखधान यांनी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना ५० हजार रुपयांची अर्थिक मदत जाहीर करुन मदतीचे आवाहन शहरात करताच महेश मापारी ५ हजार,माजी नगरसेवक जितेंद्र कुऱ्हे ५०१,मास्टर सुरेश लव्हाटे १००१,भाजपाचे युवानेते मनोज पारखे ५ हजार रुपये, अदिनाथ व्यवहारे १००१,हेमंत शेवाळे १००१ व अन्य सामाजिक व राजकिय क्षेञातील दानशुर व्यक्ती पुढे येवून शहरात झालेल्या जळीत कांडातील व्यापाऱ्यांना अर्थिक मदतीचा हातपुढे करुन पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना उभे करण्यासाठी मदत करुन सामाजिक भावना जपत असल्यामुळे नेवासकरांतून दानशुर व्यक्तींवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.





