मुंबई – क्रूझवरील ड्रग पार्टीच्या तपासासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज बॉलीवूडमधील सुपरस्टार शाहरुख खानच्या घरी जाऊन चौकशी केली, असे सूत्रांनी सांगितले. मुंबईच्या किनाऱ्याजवळ क्रूझवरील पार्टीवर धाड टाकून “एनसीबी’ने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि काही अन्य व्यक्तींना 3 ऑक्टोबरला अटक केली आहे. यावेळी “एनसीबी’ने अंमलीपदार्थही जप्त केले होते. त्या प्रकरणाच्या तपासासाठी “एनसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज दुपारी बांद्रा येथील शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर जाऊन काही कागदपत्रे तपासली.
याचबरोबर “एनसीबी’च्या दुसऱ्या टीमने अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी जाऊनही चौकशी केली. अनन्या पांडेला “एनसीबी’समोर उपस्थित राहून जबाब नोंदवण्यात सांगण्यात आले होते. अनन्या पांडेने या तपासात “एनसीबी’ला सहकार्य करावे अशी अपेक्षा “एनसीबी’ने व्यक्त केली आहे. आर्यन खानच्या फोनमधील व्हॉटस ऍप चॅटच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे “एनसीबी’ने ही चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, शाहरुख खानने आज आर्थर रोड कारागृहात जाऊन आर्यन खानची भेट घेतली. आर्यनचा जामीन अर्ज काल विशेष न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. ड्रग्जशी संबंधित उद्योगात नियमितपणे सहभाग असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. त्याच्या व्हॉटस ऍपवरील चॅटवरून तो ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात 26 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
दरम्यान, नेटकऱ्यांनी फेबसूक, ट्विटर तसेच इतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर शाररुख खान तसेच मन्नत ट्रेंडिंगला आहे. काही नेटकरी तसेच फॅन्सने शाहरुखसाठी प्रार्थना केली आहे. सध्या तुम्ही अडचणीत आहात. पण आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे एका नेटकऱ्यांने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने काही दिवसांनी सगळं काही ठीक होईल, असा विश्वास व्यक्त केलाय. तसेच एका नेटकऱ्याने सत्य लवकरच बाहेर येईल असं सांगितलं आहे.
WE LOVE YOU SRK https://t.co/JsMXB7T1wW
— SAIJI's nabanita 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🪔 (@nabanita_1994) October 21, 2021
.@iamsrk stay strong khan sahab hum sab aapke saath hai pic.twitter.com/fAxTlMiTNA
— Javed (@JoySRKian_2) October 21, 2021
#ShahRukhKhan is Love ❤️
— Shabnam 🌸 (@ShabnamKhan000) October 21, 2021