T20 WorldCup – टी-२० विश्वचषक २०२२ च्या २७ व्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा ६५ धावांनी पराभव केला. सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने १६७ धावा केल्या होत्या. श्रीलंकेला विजयासाठी १६८ धावांची गरज होती, मात्र संघ १०२ धावांवरच सर्वबाद झाला. सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ग्लेन फिलिप्सच्या शतकीय खेळीच्या बळावर न्यूझीलंडने २० षटकात ७ गडी गमावून १६७ धावा केल्या.
India vs South Africa | पाकिस्तान करणार टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना
प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाला टिकता आले नाही. श्रीलंकेने आपले पहिले ६ गडी अवघ्या ५८ धावांत गमावले होते. ट्रेंट बोल्टने श्रीलंकेच्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. त्याने कुसल मेंडिस, धनंजय डी सिल्वा, चारिथ अस्लंका आणि कर्णधार दसून शनाका यांना बाद केले. श्रीलंकेकडून भानुका राजपक्षेने २२ चेंडूत ३४ तर दसून शनाकाने ३२ चेंडूत ३४ धावांची खेळी खेळली. याव्यतिरिक्त कोणत्याही श्रीलंकन फलंदाजाला दुहेरी आकड्यात धावा करता आल्या नाहीत.
पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाचीही सुरुवात अत्यंत खराब झाली. कारण पहिले ३ गाडी त्यांनी अवघ्या १५ धावांवरच गमावले होते. यांनतर ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिचेल ( २२ धावा ) यांनी डावाला सावरले. या सामन्यात ग्लेन फिलिप्सने ६१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने ६४ चेंडूत ४ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडने २० षटकात ७ गडी गमावून १६७ धावा केल्या.
A big win for New Zealand to keep their net run rate soaring 😍#T20WorldCup | #NZvSL | 📝: https://t.co/7YevVnQdfG pic.twitter.com/gnlGWMNVCx
— ICC (@ICC) October 29, 2022
न्यूझीलंड संघाने गोलंदाजी कमालीची कामगीरी केली. ट्रेंट बोल्टने ४ षटकांत फक्त १३ धावा खर्च करत श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना तंबूत पाठवले. सुपर-१२ च्या ( T20 WorldCup ) गट-१ मध्ये न्यूझीलंड संघ ५ अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंड आणि आयर्लंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.