मोनालिसाचा नवा लूक पाहून नेटकरी फिदा! ‘जय महाकाल’ व्हिडिओ म्युझिकद्वारे प्रेक्षकांच्या येणार भेटीला

Mona Lisa New Look : मुहाकुंभ मेळावा २०२५ मधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. असाच एक हार विकणाऱ्या एका घाऱ्या डोळ्यांच्या मोनालिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर तिला मोठी लोकप्रियता मिळाली. मोनालिसाची वाढती लोकप्रियता पाहता तिला दिग्दर्शकाने चित्रपट करण्याची अॅाफर देखील दिली होती. मोनालिसा तिच्या इन्स्टावर सक्रिय असून, तिच्या लूकची फोटो ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमी शेअर करत असते.
नुकताच तिने इन्स्टाग्रावर तिचे फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्ट्राग्रावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत तिने पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने ‘जय महाकाल’ गाण्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे, आम्ही रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहोत. या गाण्याला भरपूर प्रेम द्या.’ असे आवाहन चाहत्यांना पोस्टच्या माध्यमातून केले आहे.
View this post on Instagram
चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी त्यांच्या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी मोनालिसाला साइन केले. तेव्हापासून ती अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली होती. आता ती तिच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहे. मोनालिसाने तिच्या ‘जय महाकाल’ या व्हिडिओ म्युझिकचे शूटिंग पूर्ण केले आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
अभिनेता उत्कर्ष सिंहसोबत मोनालिसा दिसत आहे. मोनालिसाने व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती सलवार-सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यामुळे प्रेक्षक तिच्या ‘जय महाकाल’ या म्युझिक व्हिडिओच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.





