Video : मंदिरात शॉर्ट्स घालून गेल्याने अंकिता लोखंडेंवर नेटकरी भडकले; म्हणाले, ‘लाज वाटली पाहिजे…’

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉसनंतर ‘स्वतंत्रवीर सावरकर’ चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. त्यानंतर अंकिताच्या हाती आणखी एक चित्रपट लागला.
अंकिताने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केली होती. निर्माता संदीप सिंगच्या नव्या वेबसीरिजमध्ये अंकिता आम्रपालीची भूमिका साकारणार आहे.
बौद्धकालीन इतिहासात उल्लेख असलेली वैशालीनगर राज्याची नगरवधू आम्रपालीची जीवनकहाणी या वेब सिरीजमधून उलगडणार आहे. पहिल्यांदाच आम्रपाली या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची कथा वेब शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
स्वतंत्रवीर सावरकर या सिनेमात अंकिताने साकारलेल्या यमुनाबाई यांच्या भूमिकेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता आम्रपाली या भूमिकेत अंकिता दिसणार आहे.
दरम्यान, असं असलं तरी नुकतंच अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत. त्यामागचं कारण म्हणजे अंकिताने परिधान केलेले कपडे. मंदिरात शॉर्ट्स घालून घेल्याने नेटकरी अंकितावर भडकले आहेत.
View this post on Instagram
अंकिताचा हा व्हिडीओ काही पापाराझींनी शूट केला आहे. मुंबईतील एका मंदिरात देवाचं दर्शन घेतल्यानंतर ती तिच्या कारकडे चालत येत होती. त्यावेळी पापाराझींनी तिचा हा व्हिडीओ शूट केला.
मात्र मंदिरात जाण्यासाठी अंकिताने जे कपडे घातले होते, ते पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
यावेळी अंकिताने ओव्हर-साइज्ड टी-शर्ट आणि शॉर्ट्स परिधान केले होते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेकतरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
‘थोडी तरी लाज वाटली पाहिजे, मंदिरात असे कपडे कोण घातलं?’, असं एकाने लिहिलं. तर ‘ही आधीपासूनच वेडी होती. बिग बॉसमध्ये जाऊन आल्यानंतर तिच्या डोक्यावर आणखी परिणाम झाला आहे’, अश्या अनेक कमेंट नेटकरी करत आहेत.





