‘उकडलेली माधुरी दीक्षित’; पापाराझींची भारती सिंहवर टीका, नेटकरी म्हणाले…

Bharti Singh | कॉमेडियन भारती सिंह सध्या ‘लाफ्टर शेफ्स सीझन 2’ चे होस्ट करत आहे. या शोच्या एका एपिसोडसाठी भारतीने ‘हम आपके है कौन’ चित्रपटातील माधुरी दीक्षितचा खास लुक केला होता. मात्र तिचा लुक पाहून पापाराझींनी भारतीवर टीका केली.
भारती तयार होऊन शोच्या सेटवर जाण्यासाठी निघाली होती. तेवढ्यात तिला पापाराझींनी घेरलं. त्यावेळी पापाराझींसाठी पोज देताना, भारतीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. त्यापैकी एकानं तिला ‘उकडलेली माधुरी दीक्षित’ असं म्हटलं.
तेव्हा भारतीनं विचारलं की, “उकडलेली माधुरी दीक्षित कोणी म्हटलं? अरे हे बघा, ती उकडलेली नाही, तर तळलेली आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही.” भारतीनं पॅप्सना साधेपणानं आणि विनोदी शैलीनं उत्तर दिलं. मात्र नेटकऱ्यांना भारतीला बॉडी शेमिंगवरून बोलणे पटलेले नाही.
View this post on Instagram
यावर नेटकऱ्यांनीही “किती भयानक कमेंट आहे, ती सुंदर दिसतेय आणि तिनं इतकी सुंदर साडी नेसली आहे”, “त्या असभ्य माणसाने किती घाणेरडी कमेंट केली”, “हे अजिबात मजेदार नव्हतं, हे पॅप्स इतके अनप्रोफेशनल आहेत. थोडा आदर करा,” अशा कमेन्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘लाफ्टर शेफ्स 2’ मध्ये गेले काही एपिसोड बॉलिवूड थीमवर भाग सादर केले जात आहेत. याच दरम्यान भारती सिंग ‘गंगूबाई काठियावाडी’ च्या वेशातही पाहायला मिळाली होती.
हेही वाचा:
महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी सक्तीची; यंदापासून नवीन शैक्षणिक धोरणाची होणार अंमलबजावणी





