Nepal News: पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच बालेन शाह यांची मोठी कारवाई; पहाटेच माजी पंतप्रधान के.पी. शर्मां आणि माजी गृहमंत्र्यांना केली अटक
Nepal News : बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या २४ तासांत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Nepal News: नेपाळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या ‘जेन-झी’ (Gen-Z) आंदोलनांदरम्यान झालेल्या हिंसाचारात गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या २४ तासांत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना भक्तपूरमधील गुंडू येथील त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले, तर रमेश लेखक यांना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास भक्तपूरमधीलच सूर्यविनायक येथून अटक करण्यात आली, अशी माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकाने दिली.
बालेन शाह सरकारचा पहिला मोठा निर्णय Nepal News
शुक्रवारी बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष आयोगाचा अहवाल लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अहवालाच्या आधारेच या हाय-प्रोफाइल अटक करण्यात आल्या आहेत. Nepal News
माजी न्यायाधीश गौरी बहादूर कार्की यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने ओली, रमेश लेखक आणि तत्कालीन पोलीस प्रमुखांवर राष्ट्रीय दंड संहितेच्या कलम १८१ आणि १८२ अंतर्गत खटला चालवण्याची शिफारस केली होती. दोषसिद्ध झाल्यास त्यांना १० वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.
काय होते प्रकरण? Nepal News
सप्टेंबर २०२५ मध्ये सोशल मीडियावरील बंदीविरोधात तरुणांनी मोठे आंदोलन केले होते, ज्याला हिंसक वळण लागले होते. या संघर्षात ७७ जणांचा मृत्यू झाला, तर संसद भवनाचेही नुकसान झाले होते. प्रशासनाने आगाऊ गुप्तचर माहिती असूनही परिस्थिती हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे.
दरम्यान, के.पी. ओली यांची अटक चीनसाठी देखील चिंतेची बाब मानली जात आहे, कारण त्यांचा कल नेहमीच चीनच्या बाजूने राहिला आहे. Nepal News
रॅपर ते पंतप्रधान
अभियंता ते रॅपर आणि काठमांडूचे महापौर ते नेपाळचे पंतप्रधानपद असा प्रवास करणारे बालेंद्र शाह हे नेपाळमध्ये लोकशाहीतून निवडून आलेले सर्वांत तरुण नेते ठरले आहेत. तर नेपाळच्या ‘मधेश प्रदेशा’तील पहिलेच नेते आहेत.
५ मार्च रोजी नेपाळमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बालेंद्र शाह यांनी चार वेळा पंतप्रधानपदी राहिलेल्या शर्मा ओलींचा झापा-५ मतदारसंघात दारुण पराभव केला होता. ‘आरएसपी’च्या लाटेत नेपाळी काँग्रेस (३८ जागा), ‘सीपीएन-यूएमएल’ (२५) आणि नेपाळी कम्युनिस्ट पार्टी (१७) या प्रस्थापित पक्षांचेही गड कोसळले होते.
या निवडणुकीत बालेंद्र यांच्या ‘आरएसपी’ला २७५ पैकी १८२ जागा मिळाल्याने पक्षाचा सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला होता.
हेही वाचा:







