नेपाळमध्ये सत्तापालट ! पंतप्रधान केपी ओली यांचा अखेर राजीनामा ; आंदोलकांनी संसद पेटवली

Nepal Gen-Z Protest । नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक वळण घेतले आहे. राजधानी काठमांडूसह अनेक भागात जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडत आहेत. निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या वैयक्तिक निवासस्थानावर कब्जा केला, तोडफोड केली आणि आग लावली. दरम्यान , या सर्वांमध्ये नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिला आहे. काल रस्त्यावर उतरलेले निदर्शक सतत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
नेपाळमधील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक वळण घेतले आहे. राजधानी काठमांडूसह अनेक भागात जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडत आहेत. निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या खाजगी निवासस्थानाचा ताबा घेतला, तोडफोड केली . तसेच आंदोलकांनी संसद पेटवली. Nepal Gen-Z Protest ।
यापूर्वी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पक्षाचे नेते रघुवीर महासेठ आणि माओवादी अध्यक्ष प्रचंड यांच्या घरांवरही हल्ला करण्यात आला होता. गृहमंत्री रमेश लेखक, कृषीमंत्री रामनाथ अधिकारी, आरोग्यमंत्री यांच्यासह पाच मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. वाढत्या दबावादरम्यान, पंतप्रधान ओली उपचाराच्या नावाखाली दुबईला जाण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.





