नेपाळच्या काठमांडूमध्ये मोठी दुर्घटना; टेकऑफदरम्यान विमान कोसळलं, 18 जणांचा मृत्यू

Nepal Plane Crash| नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये टेकऑफ दरम्यान विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या विमानात 19 जण प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचे विमान उड्डाण घेत असताना अपघात झाला. हे विमान पोखराला जात असताना सकाळी अकराच्या सुमारास विमानाला अपघात झाला.
View this post on Instagram
शौर्य एअरलाइन्सच्या विमान क्रमांक MP CRJ 200 ने रनवे 2 वरून पोखरा येथे उड्डाण केले, परंतु तांत्रिक बिघाडामुळे, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच आग लागली आणि प्रचंड धुराचे लोट पसरले. अपघातानंतर संपूर्ण विमानतळावर एकच गोंधळ उडाला. शौर्य विमानात एकूण 19 जण होते, यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पायलटवर उपचार सुरू आहेत.
टीआयएचे प्रवक्ते प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले की, विमानातील कर्मचाऱ्यांसह 19 जण पोखरा येथे जाणाऱ्या विमानात होते. सकाळी अकराच्या सुमारास विमान कोसळले. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. तर विमानाचे कॅप्टन एम. आर. शाक्य यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले आहे.
#WATCH | Plane crashes at the Tribhuvan International Airport in Nepal’s Kathmandu
Details awaited pic.twitter.com/DNXHSvZxCz
— ANI (@ANI) July 24, 2024
हेही वाचा:
मोठी बातमी ! मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण केलं स्थगित ; कारण देत म्हणाले,”खोटं आणि बेगडी”





