ना दीपिका, ना आलिया…; ‘या’ अभिनेत्रीने केली दोन वर्षांत 3300 कोटींची कमाई

Rashmika Mandanna। साऊथची टॉप अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे बॉलिवूड डेब्यू नुकतेच झाले. ‘ॲनिमल’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. रश्मिका नेहमीच हेडलाईन्सचा भाग राहते. ॲनिमल नंतर अभिनेत्री ‘पुष्पा-2’ आणि ‘छावा’ या सिनेमात काम केलं आहे. हे चिन्ही चित्रपट ब्लॉकब्लास्टर ठरले आहेत.
तिकीट बारीवर या तिन्ही सिनेमांनी तुफान कमाई करत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. याशिवाय रश्मिका सलमान खानसोबत ‘सिकंदर’ चित्रपटातही दिसणार आहे. या सिनेमाचा टिझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
दोन वर्षात रश्मिकाच्या चित्रपटांनी इतकी कमाई केली आहे की, आलिया आणि दीपिकाच्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. या तिन्ही चित्रपटाने वर्ल्डवाईड ग्रॉस 3300 कोटींची कमाई केली आहे.
भारतात तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दिली होती. अॅनिमलने 503 कोटींची कमाई केली होती. तर, पुष्पा 2 ने 812 कोटी तर छावाने 700 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या अभिनेत्रीने बॉलिवूडच्या अनेक बड्या अभिनेत्रींना मागे टाकल्याचं दिसून आलं आहे.
नॅशनल क्रश ‘रश्मिका मंदाना’ :
रश्मिकाला साऊथसोबतच हिंदी सिनेसृष्टीही खूप आवडते. असं तिने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होत. रश्मिका ही मुळची साउथची हिरोइन आहे. कन्नड आणि तेलगु भाषांवर तिचे अधिक प्रभुत्व आहे. मात्र तरीही तिने आत्तापर्यंत अनेक हिंदी सिनेमे केले आहेत. रश्मिका मंदाना नॅशनल क्रश देखील आहे. त्यामुळं प्रेक्षकही तिला पसंती देत आहेत.
रश्मिका-विजय देवरकोंडा प्रेम कहाणी :
रश्मिका ही अभिनेता विजय देवरकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर विजय देवरकोंडा आणि रश्मिका अनेकदा एकत्र दिसतात. मात्र रिलेशनशिपच्या चर्चेनंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र, या वृत्ताला दोघांकडून ही कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नसल्याचं देखील दिसून आलं होत.
श्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या केमिस्ट्रीचे लाखो चाहते आहेत. ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटात हे दोघे एकत्र झळकले होते. या दोन्ही चित्रपटात त्यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले होते. तेव्हापासून रश्मिका आणि विजय यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या.





