Neha Dhupia: पोट फुगणं आणि पचनाच्या त्रासावर नेहा धुपियाचा घरगुती उपाय; अँटी-ब्लोटिंग ड्रिंकची सोपी रेसिपी

Neha Dhupia: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पोट फुगणं, अपचन, जडपणा अशा समस्या सतावत आहेत. या त्रासांवर घरच्या घरी करता येईल असा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय अभिनेत्री नेहा धुपिया हिने शेअर केला आहे. सोशल मीडियावर नेहमीच फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाईलबाबत मार्गदर्शन करणारी नेहा यावेळी तिचं खास अँटी-ब्लोटिंग ड्रिंक चाहत्यांसोबत शेअर करताना दिसली.Neha Dhupia
अलीकडेच २१ दिवसांच्या अँटी-इंफ्लेमेटरी चॅलेंजद्वारे लोकांना निरोगी जीवनशैलीकडे वळण्याची प्रेरणा दिल्यानंतर, नेहाने पचन सुधारण्यासाठी आणि ब्लोटिंग कमी करण्यासाठी रात्री घेतल्या जाणाऱ्या एका पेयाची माहिती दिली आहे. नेहाच्या मते, हे पेय पोट शांत ठेवण्यास मदत करतं, पचन सुधारतं आणि झोपण्यापूर्वी शरीराला आराम मिळतो.
नेहा म्हणाली, “हे माझं रोज रात्री घेण्याचं पेय आहे. यामुळे पोट फुगणं कमी होतं, पचन सुधारतं आणि झोपही चांगली लागते. नियमित घेतल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम जाणवतो.”Neha Dhupia
अँटी-ब्लोटिंग ड्रिंक कसं तयार कराल?
- एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात
- बडीशेप
- ओवा
- जिरे
- थोडं बारीक चिरलेलं आलं
- आवडीनुसार थोडंसं लिंबूNeha Dhupia
हे सगळं मिश्रण साधारण ५ मिनिटं उकळा. नंतर ते कोमट अवस्थेत प्या.
View this post on Instagram
“इतकंच करा आणि तुमचं रात्रीचं अँटी-ब्लोटिंग ड्रिंक तयार. माझ्यासाठी ते जादूसारखं काम करतं. चवीला छान आणि दिसायलाही आकर्षक आहे,” असं नेहाने सांगितलं.
या उपायासाठी नेहाने तिच्या न्यूट्रिशनिस्ट रिचा गंगानी यांचे आभार मानले आहेत. तसेच, कोणताही आरोग्यविषयक उपाय करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे, कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते.
दरम्यान, नेहा धुपिया ही अभिनयासोबतच फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठी ओळखली जाते. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि घरगुती उपाय यांचा समतोल ठेवून ती स्वतःला फिट ठेवते.
वरील माहिती अभिनेत्री नेहा धुपियाने शेअर केलेल्या अनुभवावर आधारित आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.Neha Dhupia





