Actress Neha Dhupia : अभिनेत्री नेहा धुपिया २० वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये आहे, पण तरीही तिला बराच काळ कामासाठी संघर्ष करावा लागतो, पण ज्यावेळी तिच्याकडे काम नसते त्यावेळी ती काय करते याबाबत अभिनेत्रीने काही गोष्टी उघड केल्या आहेत. नुकतीच तिने बॉलीवूड हंगामाला मुलाखत दिली. अभिनेत्री नेहा धुपियाने तिच्या आत्तापर्यंतच्या बॅालीवूड इंडस्ट्रीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने मुख्य अभिनेत्रीपासून ते सहाय्यक अभिनेत्रीपर्यंतच्या भूमिका साकारल्या आहेत. अर्थात ती अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे, परंतु जेव्हा तिला काम मिळत नाही तेव्हा रिकामे बसणे तिला खूप वेदनादायक असते असे मत अभिनेत्रीने व्यक्त केले आहे. हे केवळ व्यावसायिकदृष्ट्याच नाही तर भावनिकदृष्ट्याही देखील कठीण आहे, असे देखील अभिनेत्री म्हणाली आहे. “जेव्हा मी काम करत नाही तेव्हा मला काळजी वाटते. माझ्याकडे परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या स्वतःच्या पद्धती आहेत. २० वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतरही जेव्हा काम मिळत नाही, तेव्हा मी उशीत डोके ठेवून रडते. मी ते तीन दिवसांपूर्वी केले होते, असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्रीने कलाकारांना काळजीमुक्त राहण्याचा सल्ला दिला जात असला तरी, प्रत्येक गोष्टीचा त्यांच्यावर परिणाम होतो, असेही तिने नमूद केले आहे. सर्वात कठीण भाग म्हणजे तुमच्या आजूबाजूला असलेल्या सर्वांना काम करताना पाहणे आणि तुम्हाला रिकामे वाटणे याचे शिल्य खूप त्रासदायक असते, असे अभिनेत्री नेहा धुपियाने सांगितले. माझ्यात आणि एका नवीन कलाकारात फरक फक्त एवढाच आहे की मी या परिस्थितींना हाताळण्याची क्षमता बाळगते. जेव्हा तुम्हाला तीन ते चार वर्षे अभिनयाचे काम मिळत नाही तेव्हा ते खूप थकवणारे असते. पण देवाच्या कृपेने, मी कधीही पूर्णपणे बेरोजगार राहिलेली नाही. हा उद्योग नक्कीच थकवणारा आहे, पण तो फायदेशीर आहे, असेही अभिनेत्री म्हणाली. हेही वाचा : Tech Tips: 5G फोनमध्येही इंटरनेट अडखळतंय? हे 5 सोपे उपाय करून लगेच मिळवा फुल नेटवर्क