Neeraj On Vinesh Controversy : विनेश फोगटबाबत नीरज चोप्राचे मोठे वक्तव्य..! देशवासियांना केली खास विनंती, पाहा Video

Neeraj Chopra On Vinesh Phogat Controversy : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिच्या स्पोर्ट्स कोर्ट (CAS) च्या सुनावणीवर भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राचे वक्तव्य आले आहे.
नीरज चोप्रा म्हणाला की, “आपल्या सर्वांना माहित आहे की, जर अशी परिस्थिती उद्भवली नसती तर तिला पदक मिळाले असते. आम्हाला पदक मिळाले तर लोक काही काळ आम्हाला लक्षात ठेवतात आणि चॅम्पियन म्हणतात. पदक हुकले तर ते आम्हाला विसरतात… मला फक्त लोकांना विनंती करायची आहे की, विनेशने देशासाठी जे केले आहे ते विसरू नका..”
#WATCH | Paris: On Sports Court CAS’s hearing of Indian wrestler Vinesh Phogat, Olympic Silver medallist, Javelin thrower Neeraj Chopra says “All of us know that if she gets the medal it will be really good. She would have got the medal if such a situation did not arise. If we… pic.twitter.com/TtKWF11Yzk
— ANI (@ANI) August 10, 2024
जगभरातून अनेक मोठे खेळाडू विनेशच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. दरम्यान, नीरज चोप्रानेही विनेश फोगटबाबत मत व्यक्त केले आहे. नीरज चोप्रा आणि विनेश फोगट चांगले मित्र आहेत. विनेशला रौप्य पदक मिळावे यासाठी तो मनापासून प्रार्थना करत असल्याचे नीरज चोप्राच्या वक्तव्यावरून दिसते.
दरम्यान, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक फायनलमध्ये अपात्र ठरविण्यात आले होते. वास्तविक, विनेश फोगट ही 50 किलो वजनी गटात सहभागी झाली होती , पण फायनलच्या दिवशी अवघे 100 ग्रॅम वजन जास्त झाल्याचा परिणाम तिला भोगावा लागला. मात्र, या निर्णयावरून बराच वाद झाला होता. मात्र, सध्या हे प्रकरण क्रीडा न्यायालय सीएएसमध्ये (CAS) आहे. क्रीडा न्यायालय सीएएस (CAS) या प्रकरणी पॅरिस ऑलिम्पिक संपण्यापूर्वी विनेश फोगट प्रकरणाचा निर्णय देऊ शकते, असे मानले जात आहे. विनेश फोगटच्या बाजूने निर्णय आल्यास तिला रौप्य पदक मिळू शकते.





