प्रकृती बिघडल्याने नीरज चोप्रा रुग्णालयात

नवी दिल्ली – भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला अचानक प्रकृती बिघडल्यामुळे पानिपत येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्याला दोन दिवसांपासून ताप आला होता. मात्र, करोना चाचणीत तो निगेटिव्ह असल्याचेही स्पष्ट झाले होते. मंगळवारी खांडरा गावातील एका कार्यक्रमाला नीरज उपस्थित होता तिथेच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्याची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. नीरजचा ताप अद्याप उतरलेला नसून त्याला आता घसा खवखवण्याचाही त्रास होत आहे.

ताप आल्यामुळेच त्याने हरियाणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रत्यक्ष न येता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती राखली होती. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.