neeraj chopra : फिनलॅंडमधील स्पर्धेतूनही नीरजची माघार
Updated On:

नवी दिल्ली -टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आगामी पावो नुरमी या अत्यंत मानाच्या समजल्या जात असलेल्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. डायमंड लीग स्पर्धेत त्याने विक्रमी कामगिरी केल्यावर त्याने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थान मिळवले होते.
त्यावेळी पुढील वर्षी पॅरिसला होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 90 मीटरचे अंतर पार करण्याचे लक्ष्यही त्याने ठेवले होते. मात्र, डायमंड लीग स्पर्धेनंतर त्याला पायाच्या स्नायूंची दुखापत झाली व त्याला या आधीच्या फेरीच्या स्पर्धेतूनही माघार घ्यावी लागली होती.
त्यामुळे आता त्याला ऑलिम्पिकपूर्वी केवळ तीन ते चारच स्पर्धांमध्ये सहभागी होत येणार असून त्यातील सरावावरच त्याची ऑलिम्पिक पदकाची भीस्त राहणार आहे.





