‘दोन मर्सिडीज दिल्या कि पद…’ नीलम गोऱ्हे यांचा गंभीर आरोप ; उद्धव ठाकरे म्हणाले,”त्यांनी त्यांचं चांगभलं केलं..”

Neelam Gorhe on Uddhav Thackeray । दिल्लीत आज 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाही सांगता होणार आहे. याच संमेलनात शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप केला.
दिल्लीत सुरु असणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावरुन आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्या विधानावर परखड मत व्यक्त केले आहे.
त्यांना शिवसेना संपवली असे त्यांना वाटत असेल, पण Neelam Gorhe on Uddhav Thackeray ।
अहिल्यानगर काँग्रेसचे अध्यक्ष निर्भीड सामाजिक कार्यकर्ते किरण काळे आज मातोश्री येथे शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांवर विचारण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी,”जाऊ द्या…मी त्याकडे लक्ष देत नाही.एक महिला म्हणून आदर आहे. त्यांनी राजकारणात त्यांचं चांगभलं केलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर मी बोलत नाही. त्यांच्या लेखी शिवसेना संपवली असे त्यांना वाटत असेल, पण माझी जुनी माणसे, निष्ठावान माणसे माझ्यासोबत आहेत,” असे म्हणत त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याला उत्तर दिले.
तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. याविषयी बोलताना नीलम गोऱ्हे उद्धव ठाकरे यांनी यांना 4 वेळा आमदार केले. त्यांनी किती मर्सिडिज दिल्या? 8 मर्सिडिज दिल्या का?, त्याच्या पावत्या त्यांनी आणून दाखवाव्यात, असे थेट आव्हान संजय राऊतांनी दिले. त्यामुळे आता त्यांच्या या आव्हानाला नीलम गोऱ्हे या कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणे गरजेचे असणार आहे.
दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची Neelam Gorhe on Uddhav Thackeray ।
कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. गल्ला गोळा करण्याचं काम त्यांना (शिंदेंना) दिलं होतं. (उबाठांच्या शिवसेनेमध्ये) दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, असा सनसनाटी आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असंही विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं. दरम्यान, मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांनी नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेतली.





