“नेहरूंनी संसदेला न कळवता पाकला ८६ कोटी दिले अन् ८० टक्के पाणी..’; एनडीएच्या बैठकीत पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

NDA Meeting। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत भाग घेतला. यावेळी त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना शाल देऊन सन्मानित केले. संसदेच्या ग्रंथालय इमारतीत झालेल्या या बैठकीत खासदारांनी सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींनी बैठकीत सिंधू पाणी कराराचा उल्लेख केला. काँग्रेसवर हल्ला करत, “भारताच्या वाट्याचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले आहे” असा आरोप केला.
समोर आलेल्या माहितीनुसार, बैठकीत पंतप्रधान यांनी,”आता या निर्णयानंतर जम्मू-काश्मीर, हरियाणा, राजस्थान, पंजाब यासारख्या राज्यांना पाण्याचा लाभ मिळेल. बैठकीत पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेबद्दलही चर्चा केली. ते म्हणाले की, आज भारताची अर्थव्यवस्था जोरदार वाढत आहे.” असा दावा केला.
‘मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय पाकिस्तानला ८६ कोटी रुपये दिले’ NDA Meeting।
बैठकीदरम्यान पंतप्रधान म्हणाले, “जवाहरलाल नेहरूंनी मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय आणि संसदेला माहिती न देता पाकिस्तानला ८६ कोटी रुपये दिले. आमचे ८० टक्के पाणी पाकिस्तानला देण्यात आले.” समोर आलेल्या माहितीनुसार, “अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर पंतप्रधान म्हणाले की १८ वर्षांनंतर अमेरिकन एजन्सी एस अँड पीने भारताचे रेटिंग सुधारले.”असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, आज एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांची ओळख करून देण्यात आली. सर्व एनडीए पक्षांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले. अशा व्यक्तिमत्त्वाला उमेदवार बनवल्याबद्दल सर्वांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांनी त्यांची ओळख सर्वांना करून दिली.
किरेन रिजिजू यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबद्दल काय म्हटले? NDA Meeting।
किरेन रिजिजू म्हणाले की, पंतप्रधानांनी सर्व पक्षांना एनडीए उमेदवाराला एकमताने पाठिंबा देण्याचे आवाहन केले. सर्वांनी मान्य केले की सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदासाठी खूप चांगले नाव आहे. आयुष्यात कोणताही वाद नाही आणि ते खूप साधे व्यक्ती आहेत. त्यांनी देखील विरोधी सहकाऱ्यांना एकमताने पाठिंबा देण्याचे विशेष आवाहन केले.





