पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार! भाजपमध्ये गेलेला ‘हा’ बडा नेता स्वगृही परतणार; अजित पवारांची शांतीत क्रांती

Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कबंर कसली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील तिन्ही पक्षांत इन्कमिंग चांगलंच वाढलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अनेक नेते स्वगृही परतत आहेत. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्ष गेलेला एक बडा नेता स्वर्गही परतणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
भाजपचे जालिंदर कामठे हे स्वगृही परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जालिंदर कामठे यांच्याकडे भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि प्रभारी पद आहे. ते गेल्या तीन वर्षांपासून भाजपमध्ये ते कार्यरत आहेत. जालिंदर कामठे यांनी शुक्रवारी पुण्यातील पक्ष कार्यालयात अजित पवारांची भेट घेतली असून त्यांचा अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातं आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्हापरिषदेसाठी मोठं बळ मिळणार आहे.
कोण आहेत जालिंदर कामठे?
जालिंदर कामठे यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. जालिंदर कामठे यांच्या पत्नी सुद्धा पुणे जिल्हा परिषदेच्या सभापती राहिलेल्या आहेत. कामठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केल्यास पुरंदर तालुक्यासह पुणे शहरातील कोंढवा परिसरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा : Priya Marathe: तेजस्विनी लोणारीची भावनिक आठवण : ‘प्रियासारखी अभिनेत्री रिप्लेस करणं कठीण होतं’





