Vikas Lawande : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन
Vikas Lawande : पुण्यातून एक महत्त्वाची कायदेशीर घडामोडी समोर आली आहे.

Vikas Lawande : वारकरी संप्रदाय, हिंदू संत-महंत आणि धार्मिक व्यक्तींविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (Vikas Lawande)
गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात असून या गुन्ह्यात तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे, त्यांच्या न्यायालयीन कोठडीची आवश्यकता नसून त्याने काही साध्य होणार नाही, असे निरीक्षण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांनी यावेळी नोंदविले. (Vikas Lawande)
गुन्ह्याचे स्वरूप आणि खटला न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात चालणारे असल्याचा विचार करून, साक्षीदारांवर दबाव टाकण्याची अथवा तत्सम गुन्हा करण्याची शक्यता लक्षात घेत आरोपींवर कठोर अटी लादता येतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. (Vikas Lawande)
आरोपी न्यायालयाच्या अटींचे पालन करण्यास तयार असल्याने भविष्यात अशा स्वरुपाचा गुन्हा करू नये, पुराव्यात छेडछाड करू नये तसेच, कायमस्वरुपी वास्तव्यासंदर्भातील पत्ता न्यायालयात सादर करावा या अटी शर्तींसह 30 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला.
२९ एप्रिल रोजी यूट्यूबवरील एका व्हिडिओमध्ये लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील संत, कीर्तनकार आणि धार्मिक व्यक्तींना ‘घुसखोर’ संबोधत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. (Vikas Lawande)
तसेच, आक्षेपार्ह भाषा वापरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका महिलेने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पुण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने लवांडे यांना दिलेले अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण काढून घेतले. (Vikas Lawande)
दरम्यान, गुरुवारी (दि. 21) लवांडे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. यावेळी, त्यांनी ॲड. मिलींद पवार यांच्या वतीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांना ॲड. सुयोग गायकवाड, अॅड. हर्षवर्धन पवार आणि ॲड. सारंग बहिरट यांनी सहकार्य केले. (Vikas Lawande)





