NCP News : राष्ट्रवादीत भूकंप? पार्थ पवारांना मंत्रिपद देण्याच्या पत्रावरून तटकरे-पटेल नाराज; फडणवीसांच्या भेटीने चर्चांना उधाण
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस आणि गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लिहिलेल्या पत्रानंतर पक्षातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे बोलले जात आहे. या पत्रात खासदार पार्थ पवार यांना आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद देण्याची जोरदार शिफारस करण्यात आली आहे. (NCP News)
सूत्रांच्या माहितीनुसार, या पत्रातील काही मजकुरामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, या भेटीमागील कारणांबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (NCP News)
१३ जुलै २०२६ रोजी लिहिलेल्या पत्रात उदयकुमार आहेर यांनी पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यामागे अनेक कारणे नमूद केली आहेत. त्यामध्ये त्यांचे तरुण नेतृत्व, राष्ट्रीय स्तरावरील संवादकौशल्य, परदेशातील शिक्षण, युवा वर्गाला आकर्षित करण्याची क्षमता आणि पक्षाचा विस्तार करण्याची क्षमता यांचा उल्लेख करण्यात आला आहे. (NCP News)
तसेच, पत्रात पार्थ पवार यांच्याविरोधात पक्षांतर्गत पातळीवर कारस्थान सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांना मोठी संधी देणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. (NCP News)
दरम्यान, पक्षातील एका पदाधिकाऱ्याने अशा स्वरूपाचे पत्र लिहिल्यामुळे ज्येष्ठ नेतृत्व नाराज झाल्याची चर्चा असली, तरी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून किंवा संबंधित नेत्यांकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. (NCP News)

या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आणि आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चांकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (NCP News)
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा





