हॉटेल भरलेली मग अर्थव्यवस्था अपयशी कशी
Updated On:

रेल्वे राज्यमंत्र्यांचा अजब तर्क
बंगळुरू : हॉटेल खचाखच भरलेली, लग्नाचे हॉल गच्च भरलेले मग मला सांगा मंदी आहे कुठे ? हा संतापजनक सवाल आहे, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा.
बहुतांश माध्यमे बरेच लोक अर्थव्यवस्था अपयशी ठरत असल्याचे बोलतात. तुम्ही नुसता विचार करा, तुम्ही कोणत्याही हॉटेलात जा, तुम्ही कोणत्याही लग्नाच्या सभागृहात जा, एकच तक्रार असते गर्दी आहे, असे ते म्हणाले. ते एका तंत्रज्ञान परिषदेत बोलत होते.
जेंव्हा तुम्हाला तिकिट मिळत नाही त्यावेळी तेथे मागणी असतेच. तेंव्हा जर मागणी येवढी असेल तर मग अर्थव्यवस्था अपयशी कशी? असा सवाल त्यांनी केला. देशाने आपल्या उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करायला हवा, असे ते म्हणाले.
आम्ही फक्त एकच गोष्ट नीट करत नाही, कठोर परिश्रम. आम्ही आता उत्पादन क्षेत्रात लक्ष घालत आहोत असे त्यांनी सांगितले.





