नयनताराने बिकिनीमुळे ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर

Entertainment News | अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या वेडिंग डॉक्युमेंट्री ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल’मुळे चर्चेत आली आहे. नयनताराने स्वतःच्या या डॉक्युमेंट्रीमध्ये तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आहेत. सुरुवातीला तिला तिच्या फिगरबद्दल ट्रोल करण्यात आले होते. त्याबाबतही तिने यात सांगितले आहे.
नयनताराने सांगितले की, ‘गजनी’ चित्रपटादरम्यान तिला सर्वात कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. 2005 मध्ये रिलीज झालेल्या ‘गजनी’ या तमिळ चित्रपटात तिने काम केले होते, त्यानंतर तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. सूर्याच्या ब्लॉकबस्टर गजनी सिनेमाबद्दल नयनतारा म्हणाली की, ‘माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट चित्रपट म्हणजे गजनी’ आहे. यात मला वजनावरून खुप ट्रोल केले होते. लोकांनी माझ्या अभिनयवरही बोट उचलत तु या सिनेमात का आहे? असे सवालही उपस्थित केले होते.’
नयनताराने पुढे सांगितलं की, ‘२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बिल्ला’ सिनेमातील एका सीनसाठी तिने बिकिनी घातली होती, त्यावरून खूप गोंधळ उडाला होता. संपूर्ण ड्रामा हा मी केलेल्या बिकिनी सीनबद्दल होता. पण मी विचार केला, या पद्धतीनेच सगळं काही बदलतं. मला काहीतरी सिद्ध करायचं आहे म्हणून मी हे केलं नाही. तर मला माझ्या दिग्दर्शकाने सांगितलं की, हा सीन आहे आणि ते आवश्यक होतं म्हणून मी ते केलं. पण माझ्यासाठी ते फायदेशीर होते असे मला वाटतं.’
दरम्यान, नयनताराने २००३ मध्ये मळ्याळम सिनेमा ‘मानसिनाक्करे मधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
हेही वाचा:





