नवाझुद्दीन सिद्दीकीचा नवा लुक समोर; व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते अचंबित

Nawazuddin Siddiqui | बॉलीवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा एक नवा लुक समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला टक्कल पडल्याचं दिसतं. त्याचा हा लुक चाहतेही चकित झाले आहे. यावरून अनेकांनी कमेंट नेमकं काय झालं? अशी विचारणा केली आहे.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवाझुद्दीनला अर्ध टक्कल पडल्याचे दिसते. तर त्याच्या मागच्या बाजूला काहीसे केस दिसतात. याशिवाय त्याने मिशाही वाढवल्यात. पण त्याचा हा लूक प्रोजेक्टशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. त्याच्या आगामी चित्रपटासाठी किंवा दुसऱ्या प्रकल्पासाठी त्याने असं केलं असावं. मात्र त्याच्या टीमने पूर्ण प्रयत्न केले की त्याचा लूक कोणासमोर येऊ नये पण पापाराझीच्या कॅमेऱ्यात ते कैद झाले आहे. Nawazuddin Siddiqui |
विशेष म्हणजे सोशल मीडियावर एकाने कमेंट करत “जेम्स बाँड ऑफ इंडिया: अजित डोभाल” असं म्हटलं आहे. यारून अजित डोभाल यांच्या बायोपिकमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीला कास्ट करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
View this post on Instagram
नवाझुद्दीनचा नवा व्हिडीओ पापाराझी पेज व्हायरल भयानीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. याद्वारे तो काही तरी नवीन घेऊन येणार असल्याचा अंदाज लावला जात आहे, त्यामुळे नेटिझन्स उत्सुक आहेत. Nawazuddin Siddiqui |
हेही वाचा:
महाराणीनंतर हुमाची दिल्ली क्राइम सीझन 3 मध्ये एन्ट्री; अनुभव शेअर करताना म्हणाली ” मला एकदाही…”





