Huma Qureshi : हॅाटस्टार या ओटीटी माध्यमावर महाराणी बनून राज्य करणारी अभिनेत्री हुमा कुरेशी आता नेटफ्लिक्सवरील एका प्रसिद्ध हिंदी वेबसिरीजमधून एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हुमा दिल्ली क्राइमच्या तिसऱ्या सीझनमध्ये एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या अगोदरच्या दोन्ही सीझनमधून भयाण वास्तव सर्वांसमोर दाखविण्यात आले. महिलांवरील होत असलेला अन्याय अत्याचारावर सिरीज आधारित असून, सत्य घटनांचा मागोवा घेऊन सिरीजचे कथानक तयार करण्यात आले आहे. हुमाने तिच्या महाराणी या वेबसिरीजमधून तिच्या अभिनयाची उंची काय आहे, याची प्रचिती सर्वांना दाखवून दिली आहे. दिल्ली क्राइममधील ट्रेलरमधील तिच्या नकारात्मक भूमिकेचे चाहते कौतुक करत आहेत. या सिरीजच्या ट्रेलर लॅान्च सोहळ्यात अभिनेत्रीने या सिरीजच्या शुटिंगचे अनुभव शेअर केले. मी दिल्ली क्राइम्सची खूप मोठी चाहती आहे. शेफाली शाहने जे केले आहे, रसिका आणि या शोमध्ये इतर सर्वांनी जे केले आहे ते अविश्वसनीय आहे. या सिरीजचा भाग असणे हा एक माझ्यासाठी सन्मान आहे, असे म्हणत हुमाने सिरीजमध्ये तिच्या असण्याबद्दल कौतुक केले. कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना हुमा म्हणाली, खूप मजा आली. इतर कलाकारांनी माझे खूप प्रेमाने स्वागत केले आणि मला पूर्णपणे पाठिंबा दिला. मला एकदाही नवीन सदस्य असल्यासारखे वाटले नाही. सगळे खूप गोड आहेत. अभिनेत्री शेफाली शाहचे कौतुक करताना हुमा म्हणाली, शेफाली आणि मी एकत्र खूप सीन्स केले कारण आमची टीम बडी दीदीसारखी होती. तनुज चोप्रा दिग्दर्शित दिल्ली क्राइम सीझन ३ ही वेबसिरीज १३ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रिंम करण्यात येणार आहे. शेफाली शाह आणि हुमा कुरेशी व्यतिरिक्त सिरीजमध्ये राजेश तैलंग, रसिका दुग्गल, अनुराग अरोरा आणि जया भट्टाचार्य हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. चाहते या वेबसिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हेही वाचा : “हातात बंदुक डोळ्यात अंगार अन्…”; वरुण धवनचा बॅार्डर 2 मधील दमदार लुक रिव्हील