नवाझुद्दीन सिद्दीकी पुन्हा दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘या’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

Nawazuddin Siddiqui | अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीच्या ‘रात अकेली है’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता ‘रात अकली है’ च्या दुसऱ्या भागाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे शुटींग दिल्लीत सुरू असून यात नवाझुद्दीन पुन्हा पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाची कथा एका छोट्या शहरातील पोलीस अधिकाऱ्याची आहे, इन्स्पेक्टर जलीत यादव जो एका वृद्ध सदस्याच्या मृत्यूच्या चौकशीत गुंततो. पहिल्या भागातील थरारनंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची अधिक उत्सुकता लागली आहे. तसेच, दिग्दर्शक हनी त्रेहान आणि लेखक दिनेश विजय यांनी या चित्रपटाच्या कथेला एक नवा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या भागात नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे, श्वेता त्रिपाठी आणि इतर कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. सिक्वेलमध्ये कोणते कलाकार पाहायला मिळणार हे अद्याप समोर आलेले नाही. Nawazuddin Siddiqui |
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, ‘रात अकेली है 2’ व्यतिरिक्त तो लवकरच मॅडॉक फिल्म्सच्या ‘थामा’ मध्ये देखील दिसणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहेत. नवाजुद्दीनचे ‘सरफरोश’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘द लंचबॉक्स’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘रईस’ हे चित्रपट सुपरहिट ठरले. Nawazuddin Siddiqui |
हेही वाचा:
भारतातील एकमेव राज्य जिथे टॅक्स भरावा लागत नाही; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या…





