भारतातील एकमेव राज्य जिथे टॅक्स भरावा लागत नाही; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या…

Tax Free State Of India | भारतातील व्यक्तीला त्याच्या कमाईवर काही टक्के कर हा भरावाच लागतो. मात्र एक राज्य असे आहे जिथे करोडो रुपये कमावणाऱ्यांना देखील एक रुपयाचाही टॅक्स भरावा लागत नाही. सिक्कीम हे राज्य केंद्र सरकारच्या आयकर कायद्यापासून मुक्त आहे. सिक्कीम हे भारतातील एकमेव टॅक्स फ्री राज्य आहे.
काय देण्यात आली सूट?
1975 मध्ये भारतात विलीन झाल्यापासून सिक्कीमला आयकरातून सूट देण्यात आली आहे. त्यावेळेस सिक्कीम हे राज्य भारतीय संघराज्यात सामील झाले नव्हते. सिक्कीमची आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि तेथील नागरिकांना आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणे हा या विशेष अधिकाराचा उद्देश होता. हे विलीनीकरण अशा अटीवर होते की विलीनीकरणानंतरही सिक्किमची जुनी कर रचना सुरू राहील. त्यानुसार भारतीय आयकर कायद्याच्या कलम 10 (26AAA) अंतर्गत देण्यात आलेल्या विशेष सूटमुळे सिक्कीममधील लोकांना आयकर द्यावा लागत नाही. Tax Free State Of India |
ही सूट सिक्किमच्या बाहेरील मालमत्तांच्या भाड्याने मिळणार्या उत्पन्नावर किंवा राज्याबाहेरील कोणत्याही उत्पन्नावर वैध नाही. 1 एप्रिल 2008 नंतर ज्या महिला राज्यातील लग्नानंतर दुसऱ्या राज्यात वास्तव करतात, त्यांनाही याचा फायदा घेता येत नाही. या युक्तिवादाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने 2008 मध्ये ते कायम ठेवले आणि जुना नियम येथे लागू आहे. अशाप्रकारे, येथील लोकांना करातून सूट देण्यात आली आहे, परंतु यासाठी काही अटी आहेत.
सिक्कीम करमुक्त ठेवण्याचा निर्णय राज्याच्या आर्थिक विकासासाठी उपयुक्त ठरला आहे. सिक्कीमचे हे करमुक्त मॉडेल देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. इतर राज्यांनीही अशी धोरणे स्वीकारल्यास भारताची एकूण आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते. सिक्कीममधील नागरिकांना मिळणारी ही कर सवलत फक्त आयकरातून तसेच वैयक्तिक उत्पन्नापुरती मर्यादित नाही, तर ही रोख्यांवर मिळणारे व्याज आणि लाभांशावरही लागू होते.
हेही वाचा:





