Nawaz Sharif : नवाझ शरीफ फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानात परतण्याची शक्यता; यापूर्वी 4 वेळा…

लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे नेते नवाझ शरीफ फेब्रुवारी महिन्यात लंडनमधून पाकिस्तानमध्ये परतण्याची शक्यता आहे. “पीएमएल-एन’ पक्षाच्यावतीने ही माहिती आज देण्यात आली.
नवाझ शरीफ यांच्या समवेत त्यांच्या कन्या आणि “पीएमएल-एन’ पक्षाच्या मुख्य संयोजक मरियम नवाझ या देखील पक्षाच्या व्यवहारांकडे लक्ष देण्यासाठी लंडनमधून परतणार आहेत, असे पंजाब प्रांताचे गव्हर्नर आणि पक्षाचे नेते बलिगूर रेहमान यांनी सांगितले. नवाझ शरीफ यांचे स्वागत करण्यासाठी आपण स्वतः विमानतळावर जाणार आहोत, असेही रेहमान यांनी सांगितले.
पंजाब आणि खैबर पख्तुन्वा या प्रांतांमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवरील पाकिस्तानात परत यावे, या पक्षाच्या विनंतीचा विचार नवाझ शरीफ करत आहेत, असे पंतप्रधानांचे विशेष सहायक मलिक अहमद खान यांनीही म्हटले आहे. पदावरून हटवण्यात आलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अलिकडेच पंजाब आणि खैबर पख्तुन्वा प्रांतातील विधानसभा विसर्जित केंल्या आहेत. त्यामुळे तेथे 90 दिवसातच मुदतपूर्व निवडणुका होणार आहेत.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/aruna-miller-becomes-marylands-first-indian-american-lieutenant-governor/
नवाझ शरीफ लंडनवरून पाकिस्तानमध्ये परतण्याच्या तारखा यापूर्वी 4 वेळा जाहीर झाल्या होत्या. मात्र तेंव्हा शरीफ परतले नव्हते. इम्रान खान यांच्या वाढत्या लोकप्रियतेला रोखण्यासाठी नवाझ शरीफ यांनी लवकरात लवकर पाकिस्तानमध्ये परत येणे गरजेचे आहे, असे मत “पीएमएल-एन’च्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जाऊ लागले आहे.





