Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची महत्वकांशी असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची लाभार्थी महिला वाट पाहत आहेत. आता या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. जानेवारी महिना संपत आला तरी लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झालेले नाहीत. यामुळे लाडकींचा हिरमोड झाला होता. आता जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिला जाणार असल्याची व्यक्त केली जात आहे. डिसेंबरपर्यंतचा हप्ता लाभर्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यावर १५०० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार असल्याचे बोलले जात होते. पंरतु पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. जिल्हा परिषद निवडणुका ७ फेब्रुवारीला होणार आहेत. त्यामुळे त्याअगोदर हप्ता जमा होऊ शकतो, असे बोलले जात आहेत. मात्र, त्या दृष्टीने हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे हप्ता आणखी लांबणीवर पडणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हेही वाचा : Gram Panchayat Election : मोठी बातमी! राज्यातील 14 हजार 237 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले जाणार, कारण काय? केवायसीमधील प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका महिलांच्या प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. अनेक महिलांनी केवायसी करुनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पडताळणी केली जाणार असल्याने केवायसी संदर्भातील लाडकींच्या समस्यांचा निपटारा अंगणवाडी सेविका करणार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखेत बदल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली विमान अपघातात निधन झाल्याने राज्य सरकारकडून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखेत बदल केला आहे. ५ फेब्रुवारी या दिवशी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ७ फेब्रुवारी या दिवशी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी ७ फेब्रुवारी ऐवजी ९ फेब्रुवारी या दिवशी पार पडणार आहे. हेही वाचा : Ajit Pawar : ८-१० दिवसांपूर्वीच भेट झाली होती…अजितदादांच्या आठवणीने हर्षवर्धन पाटील झाले भावूक; पहा काय म्हणाले